वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरुद्ध मोहिम चौकाचौकात वाहतूक पोलिसांकडून होणार तपासणी

Foto

 
औरंगाबाद : शहरात भरधाव वेगामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आज पासून वाहतूक विभागाने नियम तोडून वाहने चालवणारे विरुद्ध कारवाईचा बडगा उभारला आहे. शहरातील मुख्य चौकाचौकात वाहनांची तपासणी मोहीम वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम वाहतूक विभाग करते. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई देखील केली जाते. मागील आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही कारवाई मंदावली होती. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याच बरोबर शहरात अपघातांची संख्याही वाढू लागली आहे. यामुळे वाहतूक विभाग पुन्हा जोमाने कारवाईला लागला आहे. वाहतुकीचे नियम तोडून वाहने चालवणाऱ्या विरुद्ध दंडात्मक तसेच कडक कारवाई सुरू केली आहे. 

विना हेल्मेट, ट्रिपल सीट, रॉंग साईड वाहन चालविणे तसेच सिग्नल तोडणे, अलपवयीन मुलांनी वाहने चालविणे, विना नंबर वाहन चालविणे, सीट बेल्ट न लावता चार चाकी गाडी चालवणे, दारू पिऊन वाहने चालवणे, वाहनावर मोबाईलचा वापर करणे आणि इतर वाहतुकीच्या कायद्याचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध आज पासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे, यापैकी एकाही प्रकारचे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या विरुद्ध जागीच दंडात्मक कारवाई केली जात आहे, इ - चलन ने देखील दंड आकारला जात आहे. तसेच वाहतूक पोलीस वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून एखादा वाहनधारक जर पळून जात असेल तर त्याच्या नंबर प्लेट ची फोटो काढून त्याला दंड केला जात आहे. आज पासून चौकाचौकात तसेच शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर देखील ही मोहीम सुरू आहे. त्यात सर्व प्रकारची वाहनांची कागदपत्रे देखील तपासली जात आहेत. ही माहिती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांनी दिली आहे.